नागपूर : महा मेट्रोच्या वतीने २१ जून सायंकाळी ४ वाजता ‘मेट्रो संवाद’ चे आयोजन सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे करण्यात आले आहे. महा मेट्रोच्या विविध मेट्रो स्टेशन येथे व्यायसायिक उपयोगाकरिता जागा उपलब्ध असून मेट्रो संवाद मध्ये महा मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी स्टेशन वर उपलब्ध जागा आणि त्यासंबंधी प्रक्रियाची विस्तृत माहिती उपस्थिताना देतील.
महा मेट्रो नागपूर अंतर्गत कस्तूरचंद पार्क ते खापरी आणि सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर पर्यंत मेट्रो सेवा संचालित केल्या जात आहे. मेट्रो स्टेशन वर व्यावसायिक उपयोगाकरिता उपलब्ध जागा पीपीपी तत्त्वांवर आणि लीज वर आवंटीत करण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहे.
इच्छुक व्यावसायिक पसंतीच्या स्टेशन वर उपलब्ध व्यायसायिक जागा निविदेच्या माध्यमाने प्राप्त करू शकतात. व्यावसायिक उपयोगा करिता सिताबर्डी इंटरचेंज, गड्डीगोदाम , छत्रपति नगर ,जयप्रकाश , उज्जवलनगर, मेट्रो स्टेशन येथे व्यावसायिक उपयोगा करिता ५,५३२ वर्ग मीटरची जागा उपलब्ध आहे. पीपीपी तत्ववावर ६० वर्षाच्या लीज वर आवंटीत करण्याचे प्रावधान करण्यात आले आहे. मेट्रो स्टेशनच्या आंतरिक आणि बाहेरील भागात जाहिरात संबंधी निविदा काढण्यात आल्या आहेत. मेट्रो स्टेशनच्या जवळ प्रवाश्यान करिता पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून ५ पार्किंग स्थानकांवर एक वर्षाच्या कालावधी करिता निविदा मागविण्यात आल्या आहेत.