Published On : Thu, Jan 23rd, 2020

जिल्हयातील १३ तालुक्यातील १३ सरपंच गुजरात दौ-यास रवाना

– पारशिवनी तालुक्यातुन सरपंच नरेश ढोणे ग्रा पं बखारी यांची वर्णी

कन्हान : – महाराष्ट्र शासन, यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १३ सरपंच व कुही येथील पंचायत समिती चे विस्तार अधिकारी व अभ्यास दौर्‍याचे जिल्हा समन्वयक मा.वामनजी आत्राम व सरपंच गुजरात राज्यातील अभ्यास दौर्‍यावर सहभागी होणार असून सदर या प्रशिक्षणामध्ये यशस्वी पंचायत राज व्यवस्था, ई ग्रामपंचायत, प्रशासकीय कारभार बचत गट, कुटीर उद्योग, ग्रामस भा, या गाव विकासाच्या दृष्टीने अभ्यास करण्याकरिता राज्यस्तरावर शासकीय दौर्‍या करीता नागपूर जिल्ह्यातून या दौऱ्यात सरपंच पत्रुजी ताजणे ग्रा. पं. धापर्ला (डोये) तह भिवापुर, सरपंच नलिनी शेरकुरे ग्रा पं पिपळधरा तह हिंगणा, सरपंच दिलिप डाखोले ग्रा प वरोडा तह कलमेश्वर, सरपंच भावना चांभारे ग्रा पं आडका तह कामठी, सरपंच सुधीर गोतमारे ग्रा पं खुर्सापार तह काटोल, सरपंच गजानन धांडे ग्रा पं आकोली तह कुही, सरपंच भुमेश्वर चाफले ग्रा पं नंदापुरी तह मौदा, सरपंच धनश्री ढोमणे ग्रा पं फेटरी तह नागपूर सरपंच उषा फुके ग्रा पं येणीकोणी नरखेड, सरपंच नरेश ढोणे ग्रा पं बखारी पारशिवनी, सरपंच रामचंद्र अडमाची ग्रा पं बांद्रा तह रामटेक, सरपंच अन्नपूर्णा डाहाके ग्रा पं वाकी तह सावनेर, सरपंच योगिता मानकर ग्रा पं वायगाव उमरेड वरील सरपंच अभ्यास दौऱ्यासाठी नागपुर वरून गुजरात ला रवाना झाले आहे.

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement