नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत आंध्रप्रदेशातून आलेल्या एका कारमधून ५० किलो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
माहितीनुसार, गुन्हेशाखेच्या पथकाला आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रविवारी सकाळी वर्धा मार्गावरील चिंचभुवन परिसरात सापळा रचण्यात आला. सकाळच्या सुमारास एचआर २६ एएक्स ०१२७ या कारला अडविण्यात आले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात तीन पोत्यांमध्ये ५० किलो ओलसर गांजा आढळला. पोलिसांनी कारचालक यशपाल नानकचंद चव्हाण (३२) व अंकित श्यामवीर सिंग (२१) दोघांनाही अटक केली. या दोन्ही आरोपींकडून गांजा, मोबाईल फोन व कार असा १७.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे, विजय दायव, शैलेष डोबोले, मनोज नेवारे, विवेक अढाऊ, सूरज भानावत, नितीन येरपुडे, सहदेव चिखले, रोहीत काळे, चंद्रशेखर पाटने, राहुल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.