मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांना राजकारणातून संपुष्टात आणण्यासाठी भाजपा आता उतरली आहे. भाजपाला महाराष्ट्रात विकास करायचा नाही.
भाजपाला भ्रष्टाचाराच्या विरोधात जायचे नाही. त्यांना बेरोजगारीबाबत लढा द्यायचा नाही. त्यांना महागाई कमी करायची नाही. भाजपा सुडाचे राजकारण करत आहे. जो कोणी नेता महाराष्ट्राची आन-बान-शान दिल्लीत गाजवतो, त्याला राजकारणातून संपवायचे, अशी कबुली भाजपानेच दिली आहे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. यावर, भाजपा नेते आणि चंद्रपूर लोकसभेसाठीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
तुमच्या घरातील पुतण्या तुमच्या विरोधात जातो आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता. तुमच्या घरातील पुतण्या बिभिषण म्हणून आमच्याकडे येतो. शेकापचे उमेदवार सख्खे भाऊ होते, तेव्हा शरद पवारांनी काय केले. त्यांचा विश्वासघात केला. तुमची तुमच्या कृतीने आणि चुकीने स्वतःच संपत आहात, असेही मुनगंटीवार म्हणाले.