नागपूर:आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. कळमेश्वर येथील सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘डिपॉझिट’ जप्त करण्याचे वक्तव्य केले होते. यावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली.
दम असेल तर उद्धव ठाकरे यांनी दक्षिण-पश्चिम नागपुरातून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान स्थानिक भाजप नेते फडणवीसांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द यशस्वी राहिली आहे. देवेंद्र फडणवीस हे स्वत:च्या कर्तुत्वाने वर आलेले नेते आहेत. वयाच्या २१ व्या वर्षीपासून ते राजकारणात आहेत. तर उद्धव हे केवळ बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे समोर आले आहेत.
अशा उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याबाबत बोलणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्यासारखे आहे. उद्धव यांनी एखाद्या कार्यकर्त्याचा बळी देण्यापेक्षा स्वत: दक्षिण-पश्चिम नागपुरातून लढून दाखवावे. तेव्हा कुणाचे डिपॉजिट जप्त होणार, हे बघू, असे संदीप जोशी म्हणाले.