Advertisement
नागपूर: सोशल मीडिया प्रभावक असलेल्या समीर स्टेलो आणि त्याच्या भावावर एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समर खान उर्फ समीर स्टेलो आणि त्याचा भाऊ अल्पवयीन तरुणीला एक पोस्ट शेअर करण्यास भाग पाडत होते. मात्र, जेव्हा पीडितेने नकार दिला तेव्हा त्यांनी तिच्याविरुद्ध असभ्य भाषा वापरली. पीडित तरुणीने सायबर पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
या दोघांविरुद्ध कलम 354 आणि पॉस्को कायदा 2012 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.