भरणाकरिता माती टक्कर मध्ये भरताना दुदैवी घटना .
वेकोलि कामठी खुली खदान नाल्या जवळ अवैध माती उपसा.
कन्हान : – वेकोलि कामठी खुली खदान नाल्या जवळ भरणाकरिता माती टक्कर मध्ये भरताना मातीची मोठी दरड कोसळल्याने त्या खाली दबुन तिन मजुरांचा मुत्यु झाल्याने वेकोलि परिसरातील नागरिकात हळहळ व्यकत होत आहे.
वेकोलि कामठी खुली खदान नाल्या जवळपास शुक्रवार (दि.१२) ला सकाळी ८.३० ते ९ वाजता दरम्यान ट्रक्टर मध्ये भरणाकरिता माती भरताना १) सुनरू मनहरे वय ३५ वर्ष, २) गंगाप्रसाद जलहरे वय ३८ वर्ष, ३) कैन्यालाल हरिजन वय ३० वर्ष तिन्ही रा कोळशा खदान ४ नंबर दफाई या तिन गरीब मजुरांचा अंगावर मातीची मोठी दरड कोसळल्याने त्या खाली दबुन मुत्यु झाल्याने वेकोलि कामठी खुली खदान परिसरातील नागरिकांत हळहळ व्यकत होत आहे.
मागील कित्येक दिवसा पासुन येथे जवळपास एका एकरा पेक्षा अधिक अवैध माती उपसा करणे बिनधास्त पणे सुरू असुन वेकोलि प्रशासन व महसुल विभाग गाढ झोपेत असल्याने नागरिकांनी प्रशासन अधिका-यावर रोष व्यकत केला.
जि प उपाध्यक्ष शरद डोणेकर व जि प सदस्य, कामगार नेते शिवकुमार यादव यांच्या मधस्थिने वेकोलि प्रशासन अधिकारी हयानी तिन्ही मंजुरांच्या परिवारांना त्वरित प्रत्येकी २० – २० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे .