Advertisement
नागपूर : पर्यावरणपूरक बस संचालनाच्या उद्देशाने नागपूर शहर बस वाहतूक अंतर्गत हिंगणा रोडवरील ऑरेंजस्ट्रीट डेपोमध्ये सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या प्रकल्पातून १७ केव्ही वीज उत्पन्न होणार असून यावर डेपोच्या संपूर्ण कार्यालयीन कामकाजाचे संचालन सुचारूपणे होणार आहे.
तसेच विजेच्या खर्चात सुद्धा मोठी बचत होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी केले. शुक्रवारी (ता. ७) परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या हस्ते ऑरेंजस्ट्रीट डेपोमधील सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, सभापतींचे स्वीय सहायक योगेश लुंगे, हंसा बस सर्व्हिसेसचे मालक दिलीप छाजेड, श्री. पारेख तसेच डेपोतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.