नागपूर: शासनाच्या नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात 25 किलोवॅट क्षमतेच्या पारेषण संलग्न सोलर रुफ टॉप प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव पर्यटन नितीन गद्रे, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
हा प्रकल्प मध्यवर्ती संग्रहालयाच्या इमारतील तीन हजार चौ. फुटाच्या जागेवर बसविण्यात आला आहे. या प्रकल्पासठी 320 वॅट क्षमतेचे एकूण 79 सोलर पॅनेल लावण्यात आले आहे. या प्रकल्पातून दररोज 100 ते 120 युनिट विजेचे दररोज उत्पादन होत आहे. महिन्याला 3000 ते 3200 आणि वर्षाला 36 हजार ते 38 हजार युनिटचे उत्पादन होईल. यामुळे संपूर्ण मध्यवर्ती संग्रहालय हे आता संपूर्णपणे सौर ऊर्जेवर आले आहे. या प्रकल्पासाठी 13 लाख 65 हजार रुपये खर्च आला आहे.