Published On : Fri, May 4th, 2018

झोनमधील पाणी प्रश्न तातडीने सोडवा : उपमहापौर

Advertisement

नागपूर: धंतोली झोन मधील पाणी समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, असे निर्देश उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार झोननिहाय जलप्रदाय समितीच्या बैठकीअंतर्गत शुक्रवार (ता.४) धंतोली झोनमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जलप्रदाय समितीचे सभापती, झोन सभापती विशाखा बांते, नगरसेवक अविनाश ठाकरे, विजय चुटेले, नगरसेविका भारती बुंदे, हर्षला साबळे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, उपअभियंता प्रदीप राजगिरे, झोनमधील डेलीगेटस्‌ शिरिष तारे, ओसीडब्लूचे प्रवीण शरण उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी झोनमधील नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या उपमहापौरांपुढे मांडल्या. प्रभागातील पाण्यासंदर्भात तक्रार करूनदेखिल ओसीडब्ल्यूचे अधिकारी दखल घेत नाही, अशी तक्रार नगरसेवक विजय चुटेले यांनी केली. त्यावर उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत नगरसेवकांच्या समन्वयाने नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात याव्या, असे निर्देश दिलेत. इंदिरानगर, दलित वाचनालय या ठिकाणी पाणी नियमित नसल्याच्या तक्रारी चुटेले यांनी केल्या.

विश्वकर्मा नगर या ठिकाणी पाणी नियमित देण्यात यावे. नागरिकांच्या समस्या १५ दिवसांच्या आत सोडविण्यात याव्या, असे निर्देश उपमहापौरांनी दिले. श्रीनगर, नरेंद्रनगर, धाडीवाल ले आऊट या ठिकाणी पाणी नियमित येत नाही, अशी तक्रार ज्येष्ठ नगरसेवक अविनाश ठाकरे यांनी केली. त्यावर बोलताना त्या ठिकाणी ओंकारनगर येथील पाणी टाकीवरून पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, ओंकारनगर येथील पाणी टाकीवरून दोन एमएलडी पाणी अतिरिक्त सोडण्यात यावे, असे निर्देश उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. रेल्वे क्वॉर्टर येथे पाण्याची भीषण समस्या आहे. त्या ठिकाणी दोन टँकर नियमित स्वरूपात लावण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

ज्या ठिकाणी पाईपलाईनसाठी खड्डे खोदण्यात आलेले आहे. ते खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे, ते बुजविले नाही, तर ओसीडब्ल्यूवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी दिला.

बैठकीला झोनमधील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement