Advertisement
मुंबई : शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरूण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
सध्या गवळी सध्या जामिनावर बाहेर आहे. मात्र गवळी यांच्या खंडणी प्रकरणासंदर्भातील काही कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गवळी याच्यावर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्ट (मोक्का) लागू करण्यासंदर्भात कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती शुक्रवारी क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी मोक्का न्यायालयात दिली.
कथित खंडणी, आर्थिक लाभ आणि 2005 मध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याणधील मालमत्ता हडप करण्यासाठी काहींना धमक्या दिल्याचा आरोप अरूण गवळी आणि त्यांच्या टोळीतील काही जणांवर आहे.