नागपूर:अजमेर दर्ग्याशी संबंधित वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.नागपूरच्या ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, मशीद किंवा दर्ग्यात मंदिर शोधणे योग्य नाही.मात्र काही काही लोक स्वस्त लोकप्रियतेसाठी कोर्टात पोहोचतात.त्यामुळे देशाचा विकास थांबतो, असे आरएसएस प्रमुखांनीही कडक शब्दात म्हटले आहे.
प्यारे खान म्हणाले की,प्रत्येक मशीद आणि दर्ग्यात मंदिर शोधणे योग्य नाही. याचा परिणाम आपल्या देशाच्या विकासावर होतो. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनीही कडक शब्दात म्हटले आहे की, सर्वत्र मंदिरे शोधणे योग्य नाही.
मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की अशा घटनांची दखल घ्यावी आणि अशी प्रकरणे न्यायालयात येण्यापासून थांबवावी. अजमेर शरीफ दर्ग्याचा इतिहास 800 वर्षांहून अधिक जुना आहे… दर्गा ही एक अशी जागा आहे जिथे सर्व धर्माचे लोक येतात.
अजमेर शरीफ दर्गा ही भारताची शान आहे आणि त्याविरुद्धचे असे दावे समर्थनीय नाहीत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मला दिल्लीला बोलावून माझ्या हाताने चादर पाठवली होती. ही देशासाठी मोठी गोष्ट असल्याचे प्यारे खान म्हणाले.