Advertisement
नागपूर : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनालीचा मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात सोनाली जखमी झाल्याने तिच्यावर नागपूरच्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु असल्याची अधिकृत माहिती ‘नागपूर टुडे’ ला मिळाली. ही घटना २५ मार्च रोजी घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच ‘नागपूर टुडे’ने सोनू सूदच्या कार्यालयात संपर्क साधला तेव्हा त्याच्या जवळच्या सहकाऱ्याने या अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला. या व्यक्तीने सोनालीच्या अपघाताची पुष्टी केली आहे सोनाली तिची बहीण आणि तिच्या मुलाबरोबर प्रवास करत होती. अपघातात सोनाली व तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले आहेत. सध्या दोघांवरही नागपूरच्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहे.