नागपूर : नागपूर शहर सुंदर व अपघात मुक्त शहर करण्याकरिता विविध उपक्रमांद्वारे जनजागृती सुरू आहे. या अंतर्गत नागपूर महानगरपालिका आणि अपघातमुक्त नागपूर समितीच्या संयुक्त विद्यमाने ‘मानवी चुकांमुळे होणारे रस्त्यांवरील अपघात’ या विषयावर ९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता स्थानिक कविवर्य सुरेश भट सभागृहात पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी राहतील. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने नगरसेविका उषा पायलट, शीतल कामडे, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, सतीश होले विशेष यावेळी उपस्थित राहतील. गोयल गंगा ग्रुपचे अनुप खंडेलवाल विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, अपघातमुक्त नागपूर समितीचे कार्याध्यक्ष राजू वाघ यांनी केले आहे.