नागपूर : दीक्षाभूमीवर १२ ऑक्टोबरला होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्ताने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था केली आहे.
विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की,विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी नागपूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ८ वरून गाड्या धावतील.
सध्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू असल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अजनी रेल्वे स्थानक अंशत: बंद आहे. त्यामुळे अजनी टर्मिनस येथून गाड्या निघणाऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ नागपूर स्थानकात हलवण्यात आल्या आहेत. नागपुरात येणाऱ्या गाड्या अजनी येथे थांबतील जेथे दीक्षाभूमी जवळ असल्याने भाविक उतरू शकतात.तर प्रवाशांना नागपूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर ट्रेनमध्ये चढण्याची सुविधा करण्यात आली आहे.
पिक-अप-एन-ड्रॉप सुविधा बंद –
11 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत नागपूर रेल्वे स्थानकावर पूर्व आणि पश्चिमेकडील पार्किंग सुविधा आणि पिक-अप-एन-ड्रॉप सुविधा बंद राहणार आहे. प्लॅटफॉर्मवर क्रमांक ८ वर अतिरिक्त सुविधा आणि सेवा पुरविल्या जातील ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पायवाट व्यवस्थापित केली जाईल. या कालावधीत सुरळीत प्रवास सुनिश्चित होईल. प्रवाशांनी बदल लक्षात घ्या आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करा, असे आवाहन विभागाच्या वतीने कारण्यातर आले आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांचा अपेक्षित मोठा मेळा पाहता, मध्य रेल्वेचा नागपूर विभाग प्रवाशांचा सुरळीत प्रवाह आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था राबवणार आहे. त्यानुसार, नागपूर रेल्वे स्थानकावरील काही सेवा 11 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्या जातील. यामध्ये संत्रा मार्केट बाजूकडील कार ते कोच सेवेचा समावेश आहे.
जी 11 ते 13 ऑक्टोबर या कालावधीदरम्यान बंद राहील. तसेच स्थानकाच्या पश्चिम बाजूस दोन आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा बंद राहील.गर्दी टाळण्यासाठी वाहनांच्या प्रवेशाचे नियमन करण्यात आले असून स्थानकावर यादरम्यान प्रवाशांची होणारी मोठी गर्दी पाहता हा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.