नागपूर : जिल्हयातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार, 10 जानेवारीला महिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय औदयोगिक शिक्षण संस्था (मुलींची), फुलमार्केट, हॉटेल हरदेवसमोर, बर्डी, नागपूर येथे करण्यात आलेले आहे.
रोजगार मेळाव्यामध्ये Patle Education Foundation, Click २ Cloud, Samarth ectronics, Recruitology, Seva Cars, Vindhya Infomedia, Labournet, Calibher. Fffiman Services Pvt d. आदी 15 पेक्षाजास्त कंपन्यामार्फत 900 पेक्षाजास्त जागांसाठी दहावी, बारावी, पदवी, पदवीत्तर, आटीआय, डिप्लोमा पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाणार आहे.
याव्दारे जिल्हयातील महिला उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तरी जास्तीत जास्त महिला उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.