वर्धा – सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटर तसेच सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल व संलग्न रुग्णालयांची आरोग्य सेवा अधिक सुरळीत व्हावी आणि रुग्णालयीन सेवेबाबत कोणतीही अडचण असल्यास सहज संपर्क साधता यावा, यासाठी अभिमत विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांची विशेष कार्य अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
तर, संस्थेतील सार्वजनिक आरोग्य विभाग संचालक डॉ. अभय मुडे यांना ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य शिबिरांचे नियोजन व समन्वयाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
रुग्णालयीन सेवेबाबत नागरिकांनी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर (९८२२३६९२७७), सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. अभय मुडे (९३७३१८७०८८) व विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर (९७६५०४७६७२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे यांनी केले आहे.