पांढरकवडा : २६ मार्च पासुन आयपीएल क्रीकेट स्पर्धेचा थरार पुन्हा एकदा सुरु झाला आहे. सुमारे दिड दोन महिने चालणाऱ्या या क्रीकेट स्पर्धेतील प्रत्येक सामण्यावर सट्टा लावणे व खाणाऱ्यांची शहरात मोठी संख्या आहे. आयपीएलच्या क्रीकेट स्पर्धेच्या माध्यमातुन शहरातील सटोडी सज्ज झाले असुन त्यांनी आपली खायवाडीची दुकाने सुरु केली आहे. पांढरकवडा शहर व तालुका सर्वच प्रकारच्या अवैद्य धंद्यासाठी कुप्रसिध्द आहे.
जनावर तस्करी, तांदुळ तस्करी, रेती तस्करी, जुगार, मटका गुटखा व तंबाखुजण्य पदार्थाच्या अवैद्य विक्रीसह येथे क्रीकेटचा सड्ढा सुध्दा मोठ्या प्रमाणात चालतो. येथील सटोडीयांकडे फक्त शहर व तालुक्यातीलच नाही तर तेलंगाणाच्या अदिलाबाद, हैद्राबाद येथील शहरातील जुगाऱ्यासह नागपुर, चंद्रपुर, गोंदीया, घाटंजी, यवतमाळ, वणी येथील जुगारी सट्टा लावीत असतात. या शिवाय अनेक बाहेर गावातील सटोडी येथील सटोडीयांकडे सट्टा उतरवित असतात. त्यामुळे येथील क्रीकेटच्या सद्व्याची व्याप्ती किती असेल हे यावरून कळुन येईल. क्रीकेट सट्टया प्रकरणी याआधीच्या तत्कालीन ठाणेदारांनी अनेक सटोडीयांवर कार्यवाह्या करून त्यांना जेरबंद केले होते. शहरामध्ये रवि, मेंडकी, गोलु, साई, गुडु, काका आदि बड्या सटोडीसह अनेक छोटे मोठे क्रीकेटच्या सयात कार्यरत आहे. यातील अनेकांवर याआधी क्रीकेट सट्टा प्रकरणी कार्यवाह्या सुध्दा झालेल्या आहे.
काही तत्कालीन ठाणेदार तथा डिवायएसपींनी तर येथील क्रीकेटच्या सटोडीयांना बाजीरावाने चांगलेच सोलुन काढले होते. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांच्या काळात येथील अनेक सटोडीयांनी बाहेरगावी बस्तान मांडले होते हे विशेष. आयपीएल स्पर्धा सुरु होण्याआधी साहेबांच्या विश्वासातील एकाने सटोडीयांशी संपर्क साधुन क्रीकेट सड्ढा चालविण्यासाठी अलिखित परवानगी मिळवून दिल्याने अनेकांनी आयपीएलचा श्री गणेशा” सुरु केल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगत आहे. त्यामुळे आगामी दिवसात येथील सटोडीयावर कार्यवाह्या होण्याची शक्यता कमीच दिसुन येत आहे. शहरातील काही सटोडीयानी आपल्यावर कार्यवाही होवु नये यासाठी काही राजकीय पक्षाच्या नेत्यांचा आडोसा घेतला आहे.
योगेश पडोळे
प्रतिनिधी पांढरकवडा