Published On : Mon, Oct 28th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मानकापूर चौकात भरधाव ट्रकची 5 दुचाकीस्वारांना धडक; एक गंभीर जखमी

Advertisement


नागपूर: शहरात भीषण अपघाताची घटना घडली. मानकापूर चौकात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (ट्रक क्रमांक एमएच 35 के 1210) एकामागून एक 4 ते 5 दुचाकीस्वारांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली.यात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे घडल्याची माहिती आहे. मानकापूर पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे काही वेळासाठी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती आता ती सुरळीत करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement