नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समिती तर्फे इंदोरा, कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे तात्काळ भूमिपूजन करुन बांधकाम करण्याच्या मागणी करिता सुरु असलेल्या बेमुद्दत जनआंदोलनाचा आजचा चौथ्या दिवशीही नागरिकांचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. आज साखळी उपोषणात तरुण युवकांनी सहभाग घेतला.
संविधान दिन 26 नोव्हेंबर पासून सूरु झालेल्या बेमुद्दत आंदोलनात शासनाच्या विरुद्ध आक्रोश नागरिकांचा दिसून येत आहे. आज सकाळ पासून निलेश खोब्रागडे, सचिन वासनिक, राकेश इखार, संतोष खडसे, आकाश इंदूरकर, पालश लिंगायत आणि अभिनय गोस्वामी या तरुण युवकांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला.
राज्यातील सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इतरत्र हलविण्याचे षडयंत्र करुन नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आज या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केले. हे प्रकल्प उत्तर नागपूरातच बांधण्यात यावे व तात्काळ भूमिपूजन करुन बांधकाम करण्याची मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संगठनेनी एकत्रित येऊन आंदोलन केल्याचे चित्र आज या ठिकाणी दिसून आले. आज मनोज बंसोड, दिलीप जैस्वाल, दिपक खोब्रागडे, राजा नगरारे, पुष्पराज तिळके, धरमकुमार पाटील, अशोक खांडेकर, कल्पना द्रोणकर, रत्नमाला गणवीर, आनंद चौरे, शहाब्बुदीन शेख, साहेबराव सिरसाट, डायना लिंगेकर सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
आंदोलनात चळवळीचे प्रबोधन गीत
आज सकाळ पासून निलेश खोब्रागडे, सचिन वासनिक, राकेश इखार, संतोष खडसे, आकाश इंदूरकर, पालश लिंगायत आणि अभिनय गोस्वामी या तरुण युवकांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. मागील चार दिवसापासून सूरु असलेल्या बेमुद्दत जनआंदोलनात अनेक आंदोलनकर्त्यांनी आपले मत मांडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे तात्काळ भूमीपूजन करण्याची मागणी केली. यावेळी अशोक नगरारे आणि रत्नमाला गणवीर यांनी चळवळीचे प्रबोधन गीत गाऊन आंदोलनकर्तामध्ये ऊर्जा निर्माण केली.
उद्याच्या साखळी उपोषणात वामन सोमकुंवर, जगदीश गजभिये, योगेश लांजेवार, पृथ्वी शेंडे आणि भीमराव वैद्य सहभाग घेणार आहेत.