कामठी :- हिंदवी स्वराज्य चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नगर कांग्रेस कमेटी गांधी भवन कार्यालय येथे कामठी शहर युवक कांग्रेस चे कार्यकारी अध्यक्ष धनेश सीरीया यांच्या वतीने आयोजित मोफत आयुर्वेदिक स्वास्थ्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला.
या शिबिराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव व माजी जी प अध्यक्ष सुरेश भाऊ भोयर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आल्या. या शिबिरात जवळपास ३०० लोकांनी लाभ घेतला .या शिबिरात मुंबई चे विशेषज्ञ डॉ कैलाश देशमुख यांनी आरोग्य सेवा पुरविली.
याप्रसंगी प्रमुख्याने कामठी नगर परिषद चे माजी अध्यक्ष शकुर भाई नागानी, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसचे महासचिव इर्शाद शेख, अनुराग भोयर, राजकुमार गेडाम कामठी शहर अध्यक्ष सेवादल सुल्तान भाई, महिला अध्यक्ष कामठी शहर सुरैया बाजी, धीरज यादव, मनोज यादव सलामत अली , प्रमोद खोबरागड़े , नगरसेविका ममता कांबले, नगरसेविका वैशाली मानवटकर, कुसुम खोबरागड़े, अरशद भाई, तौसीफ फैजी, फारूक कुरैशी,हरशद खडसे, सुलेमान अब्बास, सोहेल अंजुम, अब्दुल सलाम, कैलाश जी बंसवानी, विष्णु जी चनोले,लुट अजमल,आकाश भोकरे, इरफान अहमद, नटवर यादव, निखील सीरिया, मंगेश मलवे, किशोर सूर्यवंशी,नितेश यादव आदी उपस्थित होते.