कामठी:-शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावे यासाठी कामठी तालुका कृषी विभागाच्या वतीने गुमथळ्यातील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शेषराव बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली राबविलेल्या प्रधानमंत्री किसान मानधन योजना शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या शिबिरात मंडळ कृषी अधिकारी प्रीती जवादे, कृषी सहाययक ज्योति शिंदे यांनी मार्गदर्शनातून जास्तित जास्त शेतकऱ्याना प्रोत्साहित केले.
याप्रसंगी 18 ते 40 वर्षे वयोगटातील 2 हॅकटर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सीमांत शेतकरी (एसएमएफ)या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत .पात्र लाभार्थ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3 हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे .लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्याची सुद्धा तरतुद या योजनेत आहे ..
तसेच 1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 40 वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह 55 ते 200 रुपये रक्कम जमा करावी लागेल सदर रक्कम 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.यात केंद्र शासनाकडून सुद्धा लाभार्थ्यद्वारे जमा केलेली रक्कम जमा करण्यात येईल.गाव पातळीवर सुविधा केंद्र(कॉमन सर्व्हिस सेंटर)लाभार्थी नोंदणी करण्यात येत आहे .नोंदणीनंत र लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हास्याची रक्कम ऑटो डेबिटने विमा कंपनी कडे जमा होईल अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी प्रीती जवादे यांनी दिली.
याप्रसंगी लाभार्थी शेतकऱ्यांना सरपंच बोरकर व मंडळ कृषी अधिकारी जवादे यांच्या शुभ हस्ते पेन्शन कार्ड सुद्धा वितरित करण्यात आले.
संदीप कांबळे कामठी