Advertisement
नागपूर: रमेश जनकराव गंधे यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय ‘श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंढरपूर येथील सुप्रसिद्ध वक्ता पुंडलिक महाराज शरणागत यांच्या मधूर वाणीतून भक्तांनी कथेचा लाभ घेतला.
बुधवार, २६ डिसेंबर २०१८ रोजी कथेला शुभारंभ झाल्यानंतर आज मंगळवार, १ जानेवारी २०१८ रोजी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या प्रित्यर्थ उद्या दिनांक बुधवार, ०२ जानेवारी २०१८ रोजी प्लॉट न. १०९, जुना सुभेदार ले-आउट, विस्तारित शारदा चौक, नागपूर येथे महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी ज्यास्तीत ज्यास्त प्रसादाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती गंधे परिवारातर्फे करण्यात आली आहे.