नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) कपिल नगर येथील ओयो पॅराडाईज स्टे इनमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.शुक्रवारी, १८ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी यशराज राजेंद्र चोकसे (वय 29, रा.मानेवाडा रोड, बेसा) याला अटक केली. तर पूजा प्रीतम दहीकर (वय 34, इंदोरा) ही आरोपी महिला फरार झाली असून पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
कारवाईत जप्त केलेल्या वस्तूंमध्ये अंदाजे 15,000 किमतीचे मोबाईल फोन आणि 19,960 किमतीच्या इतर साहित्याचा समावेश आहे.
पीआय कविता इसरकर यांच्या नेतृत्वाखालील एसएसबी पथकाने ही कारवाई केली. पुढील तपासासाठी हे प्रकरण कपिल नगर पोलिस स्टेशनकडे सोपवण्यात आले आहे. कपिल नगर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.