Advertisement
पुणे : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, आता दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांना आपल्या निकालाचे वेध लागले आहेत. दहावीचा निकाल उद्या शनिवारी 8 जून रोजी जाहीर होणार आहे.
दुपारी 1 वाजल्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या निकालासंबंधीत विविध तारखा फिरत होत्या.
मात्र तो मेसेज चुकीचा असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं होत. त्यानंतर आज अखेर बोर्डाने उद्या 8 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचं स्पष्ट केलं.
निकाल कुठे पाहाल ?
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com