Advertisement
दररोज ३०० वर अधिक लोकांच्या जेवणाची व्यवस्था*
नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके मित्र परिवारातर्फे लॉकडाऊनमध्ये फसलेल्या लोकांची मदत केली जात आहे.
स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके आणि त्यांच्या सहका-यांच्या वतीने दररोज शहरातील विविध भागातील ३०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय मनपाच्या यंत्रणे सोबत ‘हँड फॉगिंग मशीन’द्वारे प्रभागात फवारणी करण्यात येत आहे.
संपूर्ण कार्यासाठी अभिषेक भोयर, राहूल ढोबळे, तुषार वानखेडे, अरविंद राऊत, मनोज डोरले, संतोष मोहंती, बाळू दुधनकर आदी सहकार्य करीत आहेत