Advertisement
नागपूर: ब्ल्यू व्हेल या हिंसक गेमच्या तावडीतून शाळकरी आणि तरुण पिढीची सुटका झाली असे वाटत असतानाच ट्रूथ अॅन्ड डेअर नावाच्या नव्या जीवघेण्या गेमने नागपुरात पाचवीतल्या एका मुलीला आपले शिकार बनवलं आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
त्याच शाळेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने मधल्या सुटीत पाचवीतल्या मुलीच्या हाताच्या बोटावर मोठ्या स्टेपलरने अचानक येऊन स्टेपल केले. या घटनेने ती मुलगी कळवळून रडू लागल्याने शिक्षिकांनी येऊन पाहिल्यानंतर त्या हादरून गेल्या.
तिला तात्काळ रुग्णालयात नेले असून, स्टेपलरची पिन काढण्यात डॉक्टरांना यश आले असले तरी, तिचा हे वृत्त लिहिस्तोवर तिच्या बोटातून वाहणारा रक्तस्राव थांबलेला नव्हता.