Published On : Wed, Dec 4th, 2019

नागपुरात ‘मिनी मंत्रालय’ सुरु करा : आमदार कृष्णा खोपडे यांची मागणी

Advertisement

भाजप सरकारने हैद्राबाद येथे सुरु केलेले मुख्यमंत्री कार्यालय पूर्ववत सुरु करण्याची आवश्यकता

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विदर्भातील गरीब रुग्णांच्या उपचारासाठी नागपूरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरु केला होता. इतकेच नव्हे तर नागपुरातील हैद्राबाद हाऊसला मिनी मंत्रालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या ठिकाणी वैद्यकीय मदतच नव्हे तर नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागत होते. परंतु सरकार बदलताच शि.का.रा. सरकारने हा सदर कार्यालय बंद करून विदर्भातील जनतेवर मोठा आघात केलेला आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वीच हा कक्ष पूर्ववत सुरु करावा, अन्यथा सभागृहात सरकारला जेरीस धरण्यासही आम्ही गय करणार नाही, अशा इशारा आमदार कृष्णा खोपडे यांनी केला.

Gold Rate
23 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले कि, महाराष्ट्रात महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरु असून या योजनेमध्ये येणारे प्रकरणाची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरु केला. या कक्षात गोरगरिबांचे दर महिन्याला शेकडो प्रकरणे मार्गी लागत होते. मात्र कालांतराने या ठिकाणी सुद्धा प्रकरणाची संख्या वाढली. विशेषत: विदर्भातील रुग्णांना मुंबईला जाणे शक्य होत नसल्यामुळे नागपूर येथील हैद्राबाद हाऊस मध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करण्यात आला. त्या माध्यमातून गरीब रुग्णांना वैद्यकीय निधी सहज उपलब्ध होऊ लागला. त्यामुळे हा कक्ष विदर्भातील गरीब रुग्णांसाठी जणू वरदान ठरत होता. मात्र या सरकारने याबाबत उदासिनता दाखविल्यामुळे अनेक गरीब रुग्णांची अडचण होत आहे.

माझे पूर्व नागपुरातील अंदाजे 2 कोटीच्या वर वैद्यकीय निधी या माध्यमातून गरीब रुग्णांना उपलब्ध करून दिला. आजही अनेक प्रकरणे या कार्यालयात प्रलंबित अवस्थेत असून अंथरुणावर असलेले रुग्ण आजही निधीच्या प्रतिक्षेत आहे. मात्र हा कक्षच बंद केल्यामुळे अनेक रुग्णांचे हाल-बेहाल आहेत. त्यामुळे विदर्भातील रुग्णांसाठी हा कक्ष पुन्हा सुरु करण्याची नितांत आवश्यकता आहे. जर हा कक्ष पूर्ववत सुरु केला नाही, तर हिवाळी अधिवेशनात सभागृहात देखील हा विषय लावून धरण्याची तयारी आमदार कृष्णा खोपडे यांनी दाखविलेली आहे.

Advertisement
Advertisement