नागपूर : शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. शहरात सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरासह नागपुरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.शहरातील सर्व मंदिरांना आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे.
नागपूर जिल्ह्यातील 700 वर्षे प्राचिन जगदंबा महालक्ष्मी मंदिर कोरडी मंदिरातही पहिल्याच दिवशी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.आज पहिल्या दिवशी महालक्ष्मी जगदंबा मातेचे स्वयंभू दर्शन भाविकांना मिळाले.
घटस्थापना मुहूर्त –
नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला म्हणजेच आज सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू झाला असून आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल.
कोणत्या देवीची पूजा कोणत्या दिवशी करावी?
3 ऑक्टोबर 2024 – घटस्थापना , शैलीपुत्र पूजा
4 ऑक्टोबर 2024 – ब्रम्हचारिणी पूजा
5 ऑक्टोबर 2024 – चंद्रघंटा पूजा
6 ऑक्टोबर 2024 – कुष्मांडा पूजा
7 ऑक्टोबर 2024 – स्कंदामाता पूजा
8 ऑक्टोबर 2024 – कात्यायनी पूजा
9 ऑक्टोबर 2024 – कालरात्री पूजा
10 ऑक्टोबर 2024 – सिद्धिदात्री पूजा
11 ऑक्टोबर 2024 – महागौरी पूजा