Published On : Tue, May 5th, 2020

राज्यातील व परराज्यातील परवानगीबाबत निर्णयदिनांक 6 मे पासून कळविण्यात येईल -रविंद्र ठाकरे

Advertisement

ई- पास प्रणाली अर्जाबाबत 8 मे पासून निर्णय

प्रवास परवानगीबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्या परवानगी नंतरच मंजुरी

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर : राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यातील जिल्ह्यात प्रवासाच्या परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज केले त्याची परवानगीबाबत 6 मे रोजी कळविण्यात येईल, तसेच ई- पास संदर्भात दिनांक 2 मे नंतर च्या अर्जाबाबत 8 मेपासून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार परवानगीचा अर्ज ज्या जिल्ह्यासाठी आहे त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतल्यानंतर परवानगी देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

परवानगी मिळण्याबाबतच्या अर्जामध्ये 4 हजार 490 अर्ज शासनाच्या वाहन व्यवस्था करावी याबाबतचे आहेत, रेल्वेची व्यवस्था झाल्यावर मोबाईलवर अर्जदारास कळविण्यात येणार आहे. स्वतःच्या वाहनाने जाण्याबाबत 2 हजार 472 अर्ज प्राप्त झाले आहेत, यापैकी 83 अर्ज नागपूर शहरातील कॅन्टोन्मेंट झोनमधील असल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. 226 अर्जदारांनी नागपूर येथील त्याचा पत्ता नमूद केला नाही व अपूर्ण आहे.

उर्वरित 2 हजार 153 अर्जांमध्ये ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांचे सोबत पत्रव्यवहार करण्यात आला. या 2 हजार 153 अर्जदारांना दिनांक 6 मे रोजी महानगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी कार्यालय येथील सेतू अथवा तहशील कार्यालय मधून परवानगीचे वितरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील 862 अर्जदाराच्या परवानगीचे वितरण संबंधित तहसीलदार कार्यालयातून केल्या जाणार आहे.

परवानगीसाठी महाराष्ट्र पोलीस ई- पास प्रणालीवर ज्या अर्जदारांनी नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरील क्षेत्रातून अर्ज केले आहे, त्याबाबत ऑनलाईन दिनांक 8 मे पासून कळविण्यात येईल असे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी कळविले आहे.

Advertisement
Advertisement