रामटेक: भारतीय स्टेट बैंक रामटेक येथे सर्वात जास्त मोठ्या प्रमानांत आर्थिक व्यवहार होतात शासकीय चालान मोठ्या प्रमानांत चेक क्लीयरिंग, नेफ्ट, आर्टिजिस होतात परंतु रामटेक शाखेचे व्यवस्थापक सह आठ नऊ कर्मचारी व् अधिकारी वर्ग मोठ्या प्रमानांत गैरहजर होते. त्यामुळे ग्रामीन भागातील लोकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागला. बाहेर गावावरुन येणाऱ्या लोकांना आल्या पावली परत जावे लागले. खूब लोकांना निराश हावे लागले एटीएम मध्ये सुद्धा पैसे निघत नाही लग्न सराई सुरु असल्यामुळे ग्राहकाना रूपयाची आवश्यकता जास्त राहते अशा वेळेस जर बँकेची ही अवस्था असेल तर पैशाची व्यवस्था कोठुन करावी हा एक मोठ्या प्रश्न लोकांना पडला आहे.
प्रभारी इंचार्ज मनोज नंदागवळी यांनी सांगितेले की बँकेत आज पंधरा कर्मचारी पैकी सहा कर्मचारी उपस्थित आहे व् एक कर्मचारी डेपुटेशन ( निवेदन ) वर काचुरवाही येथे गेला आहे बाक़ी रजेवर गेले आहे.
मार्च एन्डिंग असल्यामुळे सिस्टीम स्लो आहे व सिस्टीम अपग्रेड नसल्यामुळे त्यामुळे लोकांचे कामे वेळेवर होत नाही. त्यामुळे लोकांची गर्दी वाढत आहे व् नाराजी व्यक्त करतात; तसेच सलग 4 दिवस सुट्या आल्याने ग्राहक याची ताराबळ उडाली आहे.