रामटेक : कोरोना च्या नावाखाली राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेची तिजोरी रिकामी करीत आहेत.
कोरोना महामारी गरीब आलेले उद्धव ठाकरे सरकारने सर्व विकास कामांना स्थगिती देऊन विकास कामे थांबविली व विकास निधी वापस करण्याचे आदेश दिले तसेच लॉकडाऊन काळात नागरिक घरात बसून होते.
हाताला काम नाही परंतु भरमसाठ वीज बिल पाठवून सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणले. यांच्या निषेधात रामटेक शहरात भारतीय जनता पार्टी च्या वतीने माजी आमदार व भाजप नेते मल्लिकार्जुन रेड्डी, यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद समोर आघाडी सरकार चा निषेध करत “भीक मांगो आंदोलन” करण्यात आले.
जमा करण्यात आलेली रक्कम , राज्य सरकारच्या तिजोरीत जमा करावे असे रामटेक चे तहसीलदार बाळा साहेब मस्के यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी आमदार व भाजप नेते मल्लिकार्जुन रेड्डी, नगराध्यक्ष दीलीप देशमुख, तालुका अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, नगर परिशद उपाध्यक्ष व शहर युवा मोर्चा अध्यक्ष अलोक मानकर रामटेक शहर भाजपा अध्यक्ष मन्साराम अहिरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, नगरसेवक प्रभाकर खेडकर , नगरसेवक संजय बिसमोगरे , नगरसेविका लता कामडे, नगरसेविका चित्रा धूरई,उज्वला धमगाये, अनिता टेटवार, पद्मा ठेंगरे, राजेश जयस्वाल, चरणसिंग यादव, रजत गजभिये, विशाल कामदार, करीम मालाधारी , नंदकिशोर कोहळे, अनिता दियेवार,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.