कोराडी. भाजपा प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी येथे बुधवार दि. ९ नोव्हेंबर रोजी दु. ३.०० वा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ते कामठी शहर व तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेणार आहेत. कार्यक्रमात कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर देखील उपस्थित राहतील.
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरातील एमटीडीसी हॉलमध्ये होणाऱ्या या जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व आमदार सावरकर कामठी शहर व तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यावेळी महसूल व पोलीस विभागासह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील. नागरिकांनी त्यांच्या समस्यांचे सविस्तर माहितीचे लेखी निवेदन सोबत आणावे, निवेदन एकच विषयाचे असावे, सोबतच निवेदन कोणत्या विभागाशी संबंधित आहे याचा उल्लेख करावा असे कळविण्यात आले आहे.
या जनसंवाद कार्यक्रमाचा लाभ कामठी शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन कामठी भाजपा तालुका अध्यक्ष किशोर बेले व शहराध्यक्ष संजय कनोजिया यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.