Published On : Sat, Aug 29th, 2020

पिकाच्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ भरपाई द्यावी, अशा मागणीचे तहसीलदार यांना दिले निवेदन

Advertisement

निकृष्ट बी-बियाणे खते पुरविण्यार्‍या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी रेड्डी यांनी निवेदनातून केली.

रामटेक- रामटेक क्षेत्रातील शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खत घेतले. मात्र बर्‍याच शेतातील बी-बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. तसेच बाजारात मोठय़ा प्रमाणावर निकृष्ट दर्जाची खते व कीटकनाशके बाजारात उपलब्ध झाल्याने त्याच्या वापरामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे.

Advertisement

त्यामुळे रामटेक तालुक्यातील सोयाबीन, कापूस आणि धान या पिकाच्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना दिले.

तसेच निकृष्ट बी-बियाणे खते पुरविण्यार्‍या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी रेड्डी यांनी निवेदनातून केली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, नगरसेवक संजय बीसमोगरे, व्यंकट कारमोरे,, माजी कृउबा सभापती अनिल कोल्हे, चरणसिंग यादव, नंदू चंदनखेडे, गजानन तरारे आदी उपस्थित होते.