तीन महिन्याचे घरगुती व उद्योग बिल सरसकट माफ करा–काटोल व्यापारी संघ काटोलचे निवेदन
काटोल : लॉकडाऊनच्या काळात मागील 3 महिन्यांपासून राज्यातील वीज ग्राहकांना विजेचे बील आले नाही. मात्र, आता एकाच वेळी भरमसाठ बील आल्याने काटोलसह राज्यातील अनेक ठिकाणी नागरीक हैराण झाले आहेत .कोरोनाच्या संकटात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. असं असतानाच आता या अवाजवी बिलांनी ग्राहकांची चिंता वाढवली आहे.
लॉकडाऊन लागू झाल्यानंतर काटोल शहरातील मजूर बेरोजगार झाले.उद्योगधंदेही ठप्प झाले. दरम्यान, कामच बंद असल्याने काटोल करांच उत्पन्नाचं साधनंही हिरावलं गेलं. त्यातच आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच वीज महामंडळाने पाठवलेल्या बिलांच्या रकमांनी ग्राहकांची पंचायत झाली आहे. वीज मंडळाचे कर्मचारी लॉकडाऊनमुळे घरोघरी वीज रिडींग घ्यायला गेलेच नाहीत. रिंडींग घेतले नसले, तरी महामंडळाने अगदी अंदाजपंचेच बील तयार करुन ग्राहकांना पाठवले आहेत.
लॉकडाऊननंतर आलेली ही बिलं अव्वाच्या सव्वा असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. त्याचा मेळ आता कसा घालणार हा प्रश्न वीज ग्राहकांसमोरील मोठा प्रश्न आहे. आधी एखाद्या ग्राहकाला सरासरी 300 रुपये बील येत असेल, तर त्याला 1500 रुपये बील आकारले गेले आहे. त्यामुळे ही बिलं कमी करण्यासाठी ग्राहकांना आता वीज मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार आहेत. वीज ग्राहकांच्या याविषयी असंख्य तक्रारी आहेत.
लॉकडाऊन शिथिल झाल्याने आता वीज मंडळाचे कर्मचारी विजेचे रिडींग घ्यायला येतील. ते बील देतील तेव्हाच 3 महिन्यांचे बिल इतके कसे आले हे कळणार आहे. विशेष म्हणजे काही ग्राहकांनी अंदाजपंचे आलेली बिलंही ऑनलाईन पद्धतने भरलेली आहेत. मात्र, काही ग्राहकांना ऑनलाईन बील भरुनही दुसऱ्यांदा बिल देताना मागचे बील वजा करुन देण्यात आले नाही. उलट 2 महिन्यांचे बील आकारण्यात आले. या सर्व गोष्टींचा विचार करुन आता काटोल शहरातील नागरीक रस्तावर उतरली आहेत. उपविभागीय अधिकारी काटोल यांच्या मार्फत ऊर्जामंत्री श्री.नितिन राऊत यांना निवेदन दिले.
यात काटोल व्यापारी संघ काटोल चे अध्यक्ष श्री.भरत पटेल, विजय महाजन,लक्ष्मीकांत काकडे,व्यापारी संघाचे कृष्णाजी रेवतकर उपस्थित होते