नागपूर : कोरोना हे देशावर आलेले संकट आहे. केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन एकत्र येऊन याविरोधात लढा देत आहे. लोकही शासनाच्या निर्देशाला प्रतिसाद देऊन या लढाईत सहभागी झाले आहे. नागपूर महानगरपालिका नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न करीत असताना काही विघ्नसंतोषी लोकं मनपाच्या हेतूवर शंका उपस्थित करून बदनामी करीत आहे. हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे मनपाचे आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ही वेळ राजकारण करण्याची नाही, हे या लोकांनी ध्यानात घ्यायला हवे. तरीही ते मानत नसेल तर त्यांच्यावर पोलिस प्रशासनाच्या माध्यमातू कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिला आहे. ते म्हणाले, पाण्यामध्ये सोडियम हायपोक्लोराइड मिश्रण करण्यात आले आहे म्हणून ते पाण्यासारखे दिसते. मनपा नियमानुसार कार्य करत आहे. त्यामुळे कोणी मनपाच्या हेतूवर शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.