पीसीपीएनडीटी कमेटी तर्फे दोन रुग्णालयांना नोटीस
नागपूर : पीसीपीएनडीटी मनपा सल्लागार समितीच्या निर्णयाप्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने रविनगर चौक येथील दंदे हॉस्पीटल आणि कामठी रोड येथील विनस क्रिटीकल केयर हॉस्पीटल ला नोटीस देवून सोनोग्राफी / सीटी स्कॅन मशीनचा वापर ताबडतोब बंद करण्याचे निर्देश दिले आहे.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी दोन्ही रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. दंदे हॉस्पीटल आणि विनस क्रिटीकल केयर रुग्णालयाला दिल्या गेलेल्या नोटीस अनुसार दोन्ही रुग्णालयाची सोनोग्राफी केन्द्राची वैधता १२ जुलै रोजी संपुष्टात आली. या संदर्भात २० जुलै रोजी कलम २० (१) अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले होते. याचे स्पष्टीकरण जुलैमध्ये आरोग्य विभागाला प्राप्त झाले. मनपा सल्लागार समिती यांनी स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे सांगितले असून निर्णय घेतला आहे की सोनोग्राफी ईको सेंटर चे नूतनीकरण न झाल्यामुळे ते अवैध आहे. म्हणून उपकलम (१) अंतर्गत सोनोग्राफी केन्द्रात असणा-या सोनोग्राफी मशीनचा वापर बंद करुन सदर मशीन्स रॅप करुन ठेवण्यात यावे तसेच नवीन नोंदणी करीता पीसीपीएनडीटी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा.
बैठकीत अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार, डॉ. वर्षा ढवळे, डॉ. विनय टुले, वीणा खानोरकर, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, डॉ. कीर्तिदा अजमेरा, डॉ.प्रशांत ओंकार, डॉ. वासंती देशपांडे आदी उपस्थित होते.