Published On : Sat, May 5th, 2018

टिल्लू पंपने पाणी चोरी करणाऱ्यांवर करा कडक कारवाई

Advertisement

नागपूर: मंगळवारी झोनमध्ये अनेक वस्त्यांमध्ये टिल्लू पंपचा वापर होत असल्याने अन्य नागरिकांना पाणी मिळत नाही. हा वापर थांबविण्यासाठी टिल्लू पंप वापरून पाण्याची चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा, असे कडक निर्देश जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या महासभेत झालेल्या निर्देशानुसार जलप्रदाय समितीतर्फे झोननिहाय बैठकांचे आयोजन सुरू आहे. याअंतर्गत शनिवारी (ता. ५) मंगळवारी झोन कार्यालयात मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागांतील नगरसेवकांची बैठक पार पडली. सदर बैठकीत ते बोलत होते.

Gold Rate
Monday 20 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 91,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बैठकीला झोन सभापती संगीत गिऱ्हे, समितीच्या उपसभापती श्रद्धा पाठक, सदस्य संजय बुर्रेवार, नगरसेवक किशोर जिचकार, नगरसेविका सुषमा चौधरी, स्नेहा निकोसे, रश्मी धुर्वे, ममता सहारे, प्रमिला मथरानी, अर्चना पाठक, साक्षी राऊत, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत उपस्थित होते.

यावेळी उपस्थित नगरसेवकांनी नागरिकांना पाण्यासाठी येत असलेल्या समस्या मांडल्या. अनेक वस्त्यांमध्ये सुरुवातीला दूषित पाणी येते. ते पाणी वाया जाते. अनेक ठिकाणी पाण्याला फोर्स नाही. पाणी चढत नाही. यामुळे नागरिक टिल्लू पंपचा वापर करतात. टिल्लू पंपचा वापर केल्याने अनेक नागरिकांना पाणी मिळत नाही. अनेक भागातील नागरिक पाण्याचे बिल नियमित भरतात. परंतु त्यांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. बेझनबाग परिसरात पाणी पोहचत नाही. गड्डीगोदाम परिसरात १३ एप्रिलपासून पाणी बंद झाले होते, अशा अनेक समस्या नगरसेवकांनी मांडल्या. यावर ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण घेत नगरसेवकांकडून आलेल्या तक्रारींचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

सभापती पिंटू झलके यांनी निर्देश देताना म्हटले की, दूषित पाण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी. टिल्लू पंप वापरणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. दुरुस्तीसाठी करण्यात आलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे आणि कुठलेही कार्य करताना प्रभागातील नगरसेवकांना विश्वासात घ्या आणि त्यांच्या समन्वयाने कार्य करा, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीला ओसीडब्ल्यूचे अधिकारी राजेश कालरा, देवेंद्र गौतम, आर. एल. पंचभाई व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Advertisement