Advertisement
नवी दिल्ली :म्यानमार आणि थायलँड भूकंपाच्या तीव्र झटक्यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. येथे 7.0 ते 7.7 मॅग्निट्यूड तीव्रतेच्या भूकंपाने दोन्ही देशांमध्ये हाहा:कार माजला आहे. अनेक इमारती पत्त्यांच्या कोसळून पडल्या.
या भूंकापने दोन्ही देशात अफरातफरी माजली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वृत्तानुसार, बँकॉकमधील एका ३० मजली इमारतीत किमान ६७ लोक अडकल्याचे वृत्त आहे.असे म्हटले जाते की जेव्हा भूकंप झाला तेव्हा इमारतीत बांधकाम चालू होते.
भूकंपाच्या केंद्रापासून ८०० मैल अंतरावर असलेल्या थायलंडच्या राजधानीत पहिल्या भूकंपाच्या झटक्यानंतर स्थानिक लोक प्रचंड घाबरले आणि त्यांनी त्यांच्या इमारतींमधून रस्त्यावर धाव घेतली आहे. त्यांनी या इमारती कोसळतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.