नागपूर: ग्रीन थीम आधारित नागपूर मेट्रो प्रकल्पात सौर ऊर्जा एक महत्वाचा घटक आहे.उर्जेचा अधिकतम वापर मेट्रो प्रकल्पात कश्या प्रकारे होतो ? याचा अभ्यास करण्यासाठी सोमवारी आयटीआय विद्यार्थ्यांनी नागपूर मेट्रोच्या सिविल लाइन येथील मेट्रो हाउसला भेट दिली .नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी लागणाऱ्या विजेची पूर्तता करण्यासाठी प्रकल्पांतर्गत अनेक महत्वाच्या ठिकाणी सौर उर्जेचे पैनल बसविण्यात आले आहे. हे सौर उर्जेचे पैनल पर्यावरणाचे संतुलन राखण्यास महत्वाची भूमिका बजावतात.
याठिकाणी वापरण्यात आलेले सौर उर्जेचे पैनल कश्या प्रकारे बसविण्यात आले ? सौर उर्जेचे पैनलमुळे कश्या प्रकारे विजेचा पुरवठा होतो ? एका सौर पैनलची किती क्षमता असते ? ते पर्यावरणासाठी कसे फायदेशीर ठरते ? अश्या अनेक प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा पैनल विषयी सम्पूर्ण माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
मिटकोंन प्रशिक्षण संस्थेतर्फे नागपूर आणि वर्धा विभागात सौर उर्जेचे तंत्र प्रशिक्षण घेणारे ४५ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकासंह मेट्रो कार्यालयात आज अभ्यास दौऱ्यानिमित्त्य भेट दिली. महा मेट्रोनागपूरच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पात सौर उर्जेचा वाटा, येथे बसवलेल्या सयंत्राची क्षमता आणि येत्या काळात सौर उर्जेचा होणारा वाढता वापर यासारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यां मार्गदर्शन केले . व्यंकटेश भंडारी, सतीश अंकम, हर्षल रघटाटे, विशाल प्रदान या काही विद्यार्थ्यांनी सौर उर्जेच्या क्षेत्रात काम करण्याचा संकल्प घेतला . वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सौर उर्जेचा वापर करने आणि त्यासाठी या क्षेत्रात कार्य करने ही आपली जवाबदारी असल्याचे मत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले .