Published On : Thu, Nov 21st, 2024
By Nagpur Today Nagpur News

विद्यार्थांनो अभ्यासाला लागा…; दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

राज्य मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत हाेणार आहेत अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

इयत्ता बारावीची सर्वसाधारण, व्दिलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा दि. ११ फेब्रुवारी राेजी सुरू हाेणार आहे तर शेवटचा पेपर १८ मार्च राेजी हाेणार आहे. यासह प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा दि. २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत हाेणार आहे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी ) परीक्षा शुकवार, दि. २१ फेब्रुवारी सुरू हाेणार असून दि. १७ मार्च राेजी संपणार आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि.३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत हाेणार आहेत.

Advertisement