दिवाणी न्यायालय रामटेक येथे लोक अदालत सम्पन्न
लोकअदालतीमुळे वेळेची बचत होते आणि आपसातील वैमनस्य संपुष्टात येऊन संबंध चांगले राहतात- दिवाणी न्यायाधिश माणिक वाघ यांचे प्रतिपादन .
रामटेक : दिवाणी न्यायालय रामटेक येथे नुकतेच राष्ट्रीय लोकअदालतिचे आयोजन करण्यात आले होते.लोकआदालतीचे दीप प्रज्वलन दिवानी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष माणिक वाघ यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सह दिवाणी न्यायाधीश व्ही पी धुर्वे उपस्थित होत्या. ”
तडजोडियोग्य असूनही न्यायालयीन प्रक्रियेमुळे वर्षांनुवर्षे न्यायाच्या परीक्षेत रखडत राहिलेले प्रकरणे ताबडतोब निकाली काढण्यात लोकअदालतीचे महत्व दिवसेदिवस वाढत आहे .नुकत्याच झालेल्या लोक अदालतीत प्रलंबित प्रकरणांवर तावडतोब सुनावणी करून दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ, सह दिवाणी न्यायाधीश व्ही .पी .धुर्वे यांनी दावे निकाली काढून प्रलंबित प्रकरणाचा त्वरित निपटारा केला .
या लोकअदालतीमध्ये 89 दिवाणी व फोउजदारी प्रकरणे व 500 वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.या लोकअदालतीमध्ये तीन प्रकरणांचा निकाल लावण्यात आला हया लोक अदालतीत दोन लाख तीस हजार रुपये ची वसुली करण्यात आली.त्याचप्रमाणे एकूण 38 वादपूर्व बँकेची प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्याद्वारे पंधरा लाख सहासस्ट हजार पस्तीस रुपये वसूल करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणातुन दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ यांनी,”लोकअदालतीमुळे वेळेची बचत होते आणि आपसातील वैमनस्य संपुष्टात येऊन संबंध चांगले राहतात ” हे पक्षकारांना समजावून सांगितले.
लोक अदालतीचे संचालन ऍड ऐ व्ही गजभिये व आभार प्रदर्शन ऍड महेंद्र येरपुडे यांनी केले.या वेळी मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.वकील संघाचे पदाधिकारी अँड . पी बी बांते,अँड .कुंती गडे,अँड .एम ऐ गुप्ता,वाय एस डोंगरे,अँड .अपराजित,हटवार,अँड .अरविंद कारामोरे ,अँड जयश्री मेन्घरे व वकील मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जे एस मेश्राम ,दिलीप पोकळे , सुधीर तालेवार,मोहन पिंजरकर,सौ . छाया खापरे,विनोद बाजारे, महेश सुरपाम,क़े .डी .गोखले यांनी महत्वाची भूमिका बजावली .दिवाणी न्यायालयात आयोजित अनेक प्रलंबित प्रकरणांवर सामंजस्याने ताबडतोब सुनावणी करून दावे निकाली काढण्यात दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ , सह दिवाणी न्यायाधीश व्ही .पी धुर्वे व वकील संघ यांना यश आल्याची बाब सिध्द झाली