नागपूर: पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या
माध्यमातून 275.5 कोटी नागरिकांच्या पैशाची बचत करण्यात आली आहे. त्यांनी निविदा घोटाळा उघड केला आणि नवीन निविदा काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी नागपूर जिल्ह्यातील इतर आमदारांच्या तुलनेत महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक मुद्दे उपस्थित केले.त्यापैकी एक मुद्दा 250 स्टँडर्ड आकाराच्या इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदी आणि संचालनासाठीच्या निविदेबाबत होता. त्यांनी या मुद्द्यावर तक्रारही नोंदवली आणि आंदोलनाचा इशारा दिला. नागपूर महानगरपालिकेला नवीन निविदा काढण्यास भाग पाडले, आणि त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत.
विकास ठाकरे यांच्या पुढाकाराने वाचले नागरिकांचे पैसे –
विकास ठाकरे यांच्या वतीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नवीन निविदेमुळे नागपूर महानगरपालिकेला मोठे यश मिळाले. कारण त्यांनी भारताच्या इतिहासातील सर्वात कमी दरात इलेक्ट्रिक-चालित बसेसच्या खरेदी आणि संचालनासाठी निविदा मिळवली आहे. इका मोबिलिटी आणि हंसा ट्रॅव्हल्सच्या संयुक्त उपक्रमाने प्रति किमी ₹62.9 (एकूण करारासाठी ₹1,148 कोटी) याचा भरणा केल्यामुळे या नवीन निविदेमध्ये सर्वात कमी दर मिळाला आहे. नागपूर महानगरपालिकेने मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या उपकंपनीला 78 प्रति किमी (एकूण करारासाठी 1,423.5 कोटी) दरावर करार देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. एकच बोली प्राप्त होऊनही नागपूर महानगरपालिका या करारावर सह्या करण्याच्या तयारीत होती. हे लोकसभा निवडणुकींच्या आचारसंहितेसह अनेक नियमांच्या विरोधात होते. ठाकरे यांच्या पुढाकाराने नागरिकांचे पैसे वाचवले आहेत.
ठाकरे पुढे म्हणाले की, मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही तीच कंपनी आहे.जी भाजपाला सर्वाधिक रक्कम इलेक्टोरल बाउंडद्वारे भेट दिली. महाराष्ट्र सरकारच्या MSRTC ने 5,000 इलेक्ट्रिक बसेससाठी मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या उपकंपनीला 78 प्रति किमी दराने करार दिला होता.नागरिकांना नवीन 250 शहर बसेस मिळणार आहेत, त्या देखील स्टँडर्ड आकाराच्या इलेक्ट्रिक बसेस.ठाकरे यांनी आपल्या यशाचे श्रेय नागपूरकरांना दिले आहे.