कन्हान : – जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे शुक्रवारी (दि.२३) ला सकाळी दहा ते पाच वाजता पर्यंत विद्यार्थी समाधान व राजस्व शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हाधिकारी मा. डॉ विपीन इटनकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री योगेश कुंभेजकर, पंचायत समिती सभापती सौ मिना कावळे, सरपंच श्री बलवंत पडोळे, जिल्हा परिषद सदस्य श्री व्यंकटेश कारेमोरे, उपसभापती श्री चेतन देशमुख, उपसरपंच श्री श्याम कुमार बर्वे प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाण पत्र, आधारकार्ड, राशन कार्ड, मतदानकार्डे व मतदान नोंदणी या प्रकार ची कामे पुर्ण करण्यात प्राधान्य देण्यात आले.
नागरिकांना या सारख्या शिबिराचा नक्कीच लाभ होईल असा आशावाद सर्व प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केला. कार्य क्रमाचे संचालन श्री खिमेश बढिये यांनी तर प्रास्तावि क तहसिलदार श्री प्रशांत सांगळे यांनी केले. कार्यक्र माचे आभार प्रदर्शन गटविकास अधिकारी श्री सुभाष जाधव यांनी व्यकत केले.
कार्यक्रमाच्या आयोजना साठी उपविभागीय अधिकारी वंदना सवंगपते, तहसिलदार श्री प्रशांत सांगळे, गट विकास अधिकारी श्री सुभाष जाधव, गटशिक्षणाधिकारी सौ वंदना हटवार, नायब तहसीलदार श्री रणजित दुसावार, केंद्रप्रमुख लता मालोदे, श्री बेंदले, सेतु केंद्र कन्हानचे शरद वाटकर, श्री सतीश भसारकर, कांद्री व कन्हान शाळेतील सर्व मुख्याध्यापक, कांद्री ग्राम पंचायतचे सचिव श्री दिनकर इंगळे व ग्राम पंचायत कांद्री येथील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कांद्री, कन्हान, सिहोरा, खेडी, बोरी, बोरडा, निमखेडा, निलज, खंडाळा, वराडा, टेकाडी, घाटरोहणा, केरडी व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.