नागपूर – शहरातील सुभाष नगर येथील आमदार विकास ठाकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एक धक्कादायक घटना घडली. रॉबर्ट फ्रान्सिस (रा.सदर, नागपूर) नावाच्या व्यक्तीने आज ठाकरे यांच्या कार्यालयाला भेट दिली असता ते मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे आढळले. कार्यालयात बसलेल्या अवस्थेत त्यांना दोन वेळा उलटी झाल्यामुळे माणुसकीच्या नात्याने आमदार यांचे स्वीय सहाय्यक स्वप्नील काटेकर यांनी त्यांना तात्काळ विवेका हॉस्पिटल, सुभाष नगर येथे भरती केले.
रॉबर्ट फ्रान्सिस यांच्या पत्नीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांमुळे तणावाखाली होते. या तणावामुळे त्यांनी आज सकाळी आत्महत्या पत्र लिहून झोपेच्या गोळ्या घेत बाहेर पडले व थेट आमदार महोदयांच्या कार्यालयात येऊन बसले. आत्महत्या पत्रात त्यांनी नमूद केले होते की नागपूर महानगरपालिकेच्या कारवाईमुळे ते आत्महत्या करीत आहेत. त्यांनी हे पत्र आमदार महोदयांना सुपूर्द केले.
या घटनेची तात्काळ चौकशी करून रॉबर्ट फ्रान्सिस यांना आवश्यक सहकार्य करण्याची मागणी स्वीय सहाय्यक स्वप्नील काटेकर यांनी राणाप्रताप नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांना पात्राच्या माध्यमातून केली आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून आवश्यक कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त काटेकर यांनी व्यक्त केली आहे.