इंदौर : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी इंग्रजी भाषेत एक पानी सुसाईड नोट लिहिली होती.पोलिसांना भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केलेल्या खोलीमध्ये एक सुसाईड नोट सापडले आहे. पोलिसांना सापडलेली सुसाइड नोट इंग्रजीत लिहिलेली होती.
आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे तणाव निर्माण झालेले आहेत. ते सहन होत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे भय्यूजी महाराजांनी लिहिले होते. आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नका असेही त्यांनी चिठ्ठीत लिहिलेले आहे.
कुटुंबाची काळजी कुणीतरी घ्या. ताण असह्य झाला आहे. खूप थकलोय. मी सोडून जात आहे, असे भय्यू महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
भय्यू महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्यानंतर त्यांना इंदूर येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. डॉक्टर म्हणाले, हॉस्पिटलला आणण्याचा अर्धातास आधी त्यांचा मृत्यू झाला होता.