Published On : Fri, Dec 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात महिलेची आत्महत्या; मैत्रिणीने पैशांसाठी तगादा लावल्याने उचलले टोकाचे पाऊल

Advertisement

नागपूर : मैत्रिणीकडून ७२ हजाराचे कर्ज घेतले आणि व्याजासह १ लाख ३८ हजार परत केले. त्यानंतरही मैत्रिणीने चक्रवाढ व्याज लावून ३ लाखांची मागणी केली. वारंवार पैशांसाठी त्रास देणाऱ्या मैत्रिणीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणात वाडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. किर्ती राहुल मेश्राम (२८ हिलटॉप कॉलनी, वाडी) असे मृत महिलेचे नाव असून प्रिती सचिन संतापे (३५, पुरुषोत्तमनगर, आठवा मैलजवळ, वाडी) असे आरोपी मैत्रिणीचे नाव आहे.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार किर्ती मेश्राम ही वाडीत पती व दोन वर्षाच्या मुलीसह भाड्याने राहायची. २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास किर्तीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पतीला तिची ‘सुसाईड नोट’ आढळली. यात महिलेने पैशांसाठी प्रितीकडून वारंवार त्रास देण्यात येत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रिती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
Advertisement