Published On : Thu, Feb 18th, 2021

सुनील हिरणवार यांनी स्वीकारला धरमपेठ झोन सभापती पदाचा पदभार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ झोन सभापतीपदी अविरोध निवडून आलेले प्रभाग १५ चे नगरसेवक सुनील दुलिचंद हिरणवार यांनी गुरूवारी (ता.१८) झोन सभापती म्हणून पदभार स्वीकारला. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत मावळते झोन सभापती अमर बागडे यांनी सुनील हिरणवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत पदभार सोपविला.

धरमपेठ झोन कार्यालय परिसरामध्ये आयोजित कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, उपनेत्या वर्षा ठाकरे, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी महापौर माया इवनाते, ज्येष्ठ नगरसेवक सर्वश्री सुनील अग्रवाल, संजय बंगाले, नगरसेविका रुपा राय, परिणिता फुके, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सर्वश्री प्रमोद कौरती, निशांत गांधी, विक्रम ग्वालबंशी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, भाजप पश्चिम मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे, सुनील हिरणवार यांच्या मातोश्री बासंतबाई दुलिचंद हिरणवार आदी उपस्थित होते.

Gold Rate
Tuesday 18 Feb. 2025
Gold 24 KT 85,800 /-
Gold 22 KT 79,800 /-
Silver / Kg 96,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नवनिर्वाचित सभापती सुनील हिरणवार कर्मठ, कर्तव्यनिष्ठ आहेत. मेहनती लोकांमध्ये कार्य करून त्यांनी स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे. नगरसेवक पदाच्या माध्यमातून झोनच्या सर्व प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य त्यांच्या हातून घडत आहे. मागील चार वर्षात धरमपेठ झोनला सर्वसमावेशक नेतृत्व मिळाले आहेत. अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधून ते यापुढेही जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मावळते झोन सभापती अमर बागडे यांनी कोव्हिडच्या संकटाच्या काळात शक्य तेवढे कार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. उर्वरित कार्य करण्याची मोठी जबाबदारी आता सुनील हिरणवार यांच्यावर आहे. प्रशासनाचा अभ्यास आणि जनसमस्यांची उत्तम जाण असलेले व्यक्तिमत्व सुनील हिरणवार आहेत. पक्षाने दिलेली जबाबदारी ते तेवढ्याच विश्वासाने ते पार पाडतील, असा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला.

माजी आमदार सुरेश देशमुख यांनीही सभापती सुनील हिरणवार यांचे अभिनंदन केले. कामाचे योग्य नियोजन करून जास्तीत जास्त वेळ जनतेचे प्रश्न सोडविण्यास द्यावा, अशी सूचना त्यांना केली. मावळते सभापती अमर बागडे यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. नगरसेवक संजय बंगाले यांनीही सभापती सुनील हिरणवार यांच्या समर्पणाचे कौतुक करीत त्यांच्या संघर्षाची माहिती दिली. असे नेतृत्व जनतेच्या प्रश्नांना नक्कीच न्याय देईल, असा विश्वास व्यक्त केला. मावळते सभापती अमर बागडे यांनीही आपल्या कारकिर्दीचा आढावा घेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

समाजासाठी काम करायला मिळाल्याचा आनंद : सुनील हिरणवार
नागरिकांच्या आणि पक्षातील ज्येष्ठ नेते, सहकारी नगरसेवकांच्या सहकार्याने इथपर्यंत पोहोचलो. सर्वांची सोबत प्रत्येक कामात मिळाल्याचा आनंद आहे. आता सभापती पदाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे आनंद आहे असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी यांचे नवनिर्वाचित सभापती सुनील हिरणवार यांनी आभार मानले. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची दिग्गजांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे कर्तव्य आहे. नागरिकांच्या विश्वासामुळेच इथपर्यंत पोहोचता आले. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास नवनिर्वाचित झोन सभापती सुनील हिरणवार यांनी व्यक्त केला.

Advertisement