मुंबई: बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे रविवारी होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन-२०१८ च्या पूर्वतयारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यू.पी.एस. मदान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, सहआयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्हीआयपी कॉन्फरन्स रूम, बैठक व्यवस्था, स्टेज, सुरक्षा याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेऊन सूचना केल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध उद्योगांच्या स्टॉलला भेटी देऊन तयारीबाबत माहिती घेतली. याठिकाणी माध्यमांसाठी मीडिया सेंटरचीही सोय करण्यात आली आहे.