Advertisement
मुंबई : अभिनेता सैफ अली खान यांच्या वांद्रे येथील घरात घुसून एका चोरट्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वांद्रे पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी या आरोपीविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसलेला आरोपी आणि पोलिसांनी वांद्रे पोलीस ठाण्यात आणलेल्या संशयिताची शरीरयष्टीसारखीच दिसत असल्याने आरोपीला अटक केले असल्याचे म्हटले जात असले तरी पोलिसांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
ताब्यात घेतलेला संशयित व्यक्ती तोच हल्लेखोर आहे हे स्पष्ट होत नाही तो पर्यंत पोलीस यावर भाष्य करणार नाही.आरोपीने सैफवर चाकूने सहा वार केले आणि त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे.